MPSC Group B Bharti 2025
MPSC Group B Bharti 2025 – परीक्षेची ओळख
चला तर मग या भरतीची संपूर्ण माहिती आमच्या Majhi nokariyojana.com या वेबसाईटवर खालील प्रमाणे पाहणार आहोत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये गट-ब श्रेणीतील अधिकारी निवडले जातात. या वर्षी एकूण 282 पदांसाठी ही भरती होणार आहे.
MPSC Group B Bharti 2025 यामध्ये मुख्यतः राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) या पदांचा समावेश आहे. ही परीक्षा स्पर्धा परीक्षा पद्धतीने घेतली जाते व तिची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. या संधीचा फायदा स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करून घ्यावा
पदाचे नाव व तपशील :
MPSC Group B Bharti 2025 या भरतीमध्ये आपण कोण कोणत्या पदांसाठी किती जागा देण्यात आलेले आहेत याची आपण खालील प्रमाणे घेणार आहोत
पदाचे नाव | पदसंख्या |
सहायक कक्ष अधिकारी (ASO) | 03 |
राज्य कर निरीक्षक (STI) | 279 |
एकूण पदसंख्या | 282 |
MPSC Group B Bharti 2025 शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
MPSC Group B Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता काय असणार आहे याची माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात (अटीनुसार).
संगणक ज्ञान प्रमाणपत्र (MS-CIT किंवा समतुल्य) असल्यास अधिक फायदेशीर ठरते.
MPSC Group B Bharti 2025 वयोमर्यादा (Age Limit)
वयोमर्यादा (Age Limit) :
MPSC Group B Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट किती असणार आहे याची माहिती आपण खालील प्रमाणे घेणार आहोत
दाखल दिनांक: 01 नोव्हेंबर 2025
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/आ.ज/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षांची सवलत
MPSC Group B Application Fee 2025
अर्ज शुल्क :
MPSC Group B Bharti 2025 या भरतीमध्ये प्रवर्गानुसार अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे हे आता आपण बघूया
प्रवर्ग | शुल्क |
खुला प्रवर्ग | ₹394/- |
मागासवर्गीय/अ.जा/अ.ज/आ.दु.घ | ₹294/- |
MPSC Group B Bharti 2025 परीक्षा केंद्र व नोकरी ठिकाण
परीक्षा केंद्र (Exam Centres) :
- संपूर्ण महाराष्ट्रातील 37 जिल्हा स्तरावरील परीक्षा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेतली जाईल.
- मुख्य परीक्षा फक्त मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे आयोजित होईल.
MPSC Group B Bharti 2025 या परीक्षेसाठी अर्ज करताना अर्ज भरून झाल्यानंतर आपण कोणत्या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा देणार आहोत याची योग्य ती तपासणी करावी
नोकरी ठिकाण :
निवड झाल्यानंतर उमेदवारांची नेमणूक संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यात येईल
Document List for MPSC Group B Exam 2025
ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे :
नवीन, पासपोर्ट साईझ फोटो (फोटोचा साईज साधारणतः 20KB ते 50KB)
स्वाक्षरी (Signature) JPG / PNG मध्ये (10KB ते 20KB)
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (Qualifying Exam Certificate)
10वीची मार्कशीट
12वीची मार्कशीट
पदवीची मार्कशीट (Final Year किंवा Consolidated)
पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) – असल्यास
- जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र
- 10वी बोर्ड प्रमाणपत्र किंवा
- जन्माचा दाखला (Birth Certificate)
- जात प्रमाणपत्र (Reservation साठी)
- SC / ST / OBC / SEBC / EWS साठी जात प्रमाणपत्र
- नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (OBC/SEBC साठी – ३ वर्षातले वैध प्रमाणपत्र)
- EWS साठी प्रमाणपत्र (जर तुम्ही EWS अंतर्गत अर्ज करत असाल तर)
- ओळखपत्र (Identity Proof)
- आधार कार्ड / PAN कार्ड / Voter ID / पासपोर्ट इ. (कोणतेही एक)
- डोमिसाईल सर्टिफिकेट (मूळ रहिवासी असल्याचा दाखला) – काही भरतीसाठी लागतो
- अनुभव प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर)
MPSC Group B Bharti 2025 या परीक्षेसाठी अर्ज करताना आवश्यक असणारे कागदपत्रे ही कागदपत्रे ओरिजनल स्वरूपात आपण ती व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करावेत
MPSC Group B Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा
महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :
घटना | दिनांक |
जाहिरात प्रसिद्धी | 29 जुलै 2025 |
ऑनलाईन अर्जाची सुरुवात | 29 जुलै 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 ऑगस्ट 2025 |
पूर्व परीक्षा | 09 नोव्हेंबर 2025 |
मुख्य परीक्षा (अपेक्षित) | जानेवारी/फेब्रुवारी 2026 |
MPSC Group B Bharti 2025 – पदांची यादी व जबाबदाऱ्या
पदांची नावे व कार्य:
MPSC Group B Bharti 2025 सहाय्यक कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक यांचे कामे काय असतात हे आपण पाहूया
1. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer – ASO)
- विभाग: मंत्रालयीन प्रशासन विभाग
- कार्य:
- शासन निर्णय तयार करणे
- फायलींची छाननी
- विभागीय स्तरावरील प्रशासकीय निर्णय प्रक्रियेची पूर्तता
- वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहाय्य करणे
2. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector – STI)
- विभाग: राज्य कर विभाग (माजी विक्रीकर विभाग)
- कार्य:
- जीएसटी व इतर अप्रत्यक्ष करांची तपासणी
- करचोरी रोखण्यासाठी छापे, तपासणी
- करसंग्रहाची माहिती घेणे व अहवाल सादर करणे
MPSC गट-ब (STI व ASO) परीक्षेचे स्वरूप
MPSC गट-ब संयुक्त भरती परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते:
- पूर्व परीक्षा (Prelims)
- मुख्य परीक्षा (Mains)
- कागदपत्र पडताळणी (Document Verification)
MPSC Group B Syllabus 2025
1. पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
घटक | माहिती |
---|---|
परीक्षा प्रकार | वस्तुनिष्ठ (Objective – MCQ) |
एकूण पेपर | 1 (सामान्य अध्ययन) |
एकूण गुण | 100 गुण |
कालावधी | 1 तास |
भाषा | मराठी व इंग्रजी (भाषिक प्रश्न वगळता) |
निगेटिव्ह मार्किंग | होय (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा) |
विषय (Prelims Syllabus):
- चालू घडामोडी
- महाराष्ट्र व भारताचा इतिहास
- भूगोल
- राज्यघटना व राजकारण
- अर्थशास्त्र
- सामान्य विज्ञान
- बुद्धिमत्ता चाचणी
2. मुख्य परीक्षा (Mains Exam)
पेपर | विषय | गुण | वेळ |
---|---|---|---|
पेपर 1 | मराठी व इंग्रजी (सामान्य भाषा) | 100 | 1 तास |
पेपर 2 | सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, कायदे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र | 100 | 1 तास |
Total: 200 गुण (पेपर 1 + पेपर 2)
- प्रश्नप्रकार: वस्तुनिष्ठ (MCQ)
- भाषा: मराठी व इंग्रजी (Sectionwise)
- Prelims qualify झाल्यावरच Mains ला पात्रता मिळते.
3. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
- मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांची गुणतक्त्यानुसार यादी तयार केली जाते.
- यामध्ये पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातात.
- काही वर्षांपासून मुलाखत (Interview) घेतली जात नाही.
- MPSC अधिकृत वेबसाइट (अर्ज व अधिक माहिती):
https://mpsc.gov.in - MPSC Online Application Portal (अर्ज साठी):
https://mpsconline.gov.in - महापोर्टल जाहिरात PDF (Official Advertisement PDF):
https://mpsc.gov.in/advertisements - या नोकरीच्या अधिक माहिती साठी :
MPSC Group B Bharti 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
MPSC Group B भरती 2025 कोणत्या पदांसाठी आहे
MPSC Group B भरती 2025 ही मुख्यतः सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI), व उपविभागीय निरीक्षक अशा गट-ब (अराजपत्रित) पदांसाठी घेतली जाते.
या परीक्षेसाठी पात्रता काय आहे?
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वय मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे आहे (आरक्षणानुसार सूट लागू).
MPSC Group B परीक्षेचे स्वरूप काय आहे?
परीक्षेचे तीन टप्पे आहेत –
पूर्व परीक्षा (100 गुण),
मुख्य परीक्षा (200 गुण – दोन पेपर),
कागदपत्र पडताळणी.
पूर्व परीक्षा पात्रता परीक्षा आहे का?
होय. पूर्व परीक्षा ही केवळ पात्रता ठरवणारी आहे. तिचे गुण अंतिम यादीत धरले जात नाहीत.
मुख्य परीक्षेत कोणते विषय असतात?
पेपर 1: मराठी व इंग्रजी भाषा (100 गुण)
पेपर 2: सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, कायदे, बुद्धिमत्ता चाचणी इ. (100 गुण)
STI पदाचे प्रमुख काम काय असते?
राज्य कर निरीक्षक (STI) हे राज्यातील कर संकलनावर नजर ठेवतात, करचोरी रोखण्याचे काम करतात आणि संबंधित तपासणी करतात.
. ASO पदाचे काम काय असते?
सहायक कक्ष अधिकारी (ASO) हे मंत्रालयातील विविध विभागांमध्ये प्रशासकीय काम पाहतात, फायलींची प्रक्रिया करतात व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्य करतात.
अर्ज फी किती आहे?
सामान्य प्रवर्ग: ₹394
मागास प्रवर्ग: ₹294
(अर्ज शुल्कात वेळोवेळी बदल होऊ शकतो, अधिकृत जाहिरात वाचा.)
परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घेतली जाते?
सध्या MPSC पूर्व व मुख्य परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने (CBT) घेतली जाते.
MPSC Group B साठी किती कट-ऑफ लागतो?
कट-ऑफ दरवर्षी बदलतो व प्रवर्गनिहाय वेगळा असतो. पूर्वीच्या कट-ऑफचा अभ्यास करून अंदाज घेता येतो.
MPSC गट-ब निवड प्रक्रियेत मुलाखत असते का?
सध्या गट-ब (अराजपत्रित) पदांसाठी मुलाखत घेतली जात नाही, अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणांवर आधारित असते.
अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक कुठे मिळेल?
MPSC च्या अधिकृत वेबसाईटवर https://mpsc.gov.in वर जाहिरात आणि अर्ज लिंक उपलब्ध असते. किवा https://majhinaukriyojana.com/ यावर संपूर्ण माहिती मिळेल .
आता वेळ वाया न घालवता “MPSC Group B Bharti 2025” साठी ऑनलाईन अर्ज करा आणि सरकारी अधिकारी होण्याच्या दिशेने तुमचं पाऊल उचला!
संपूर्ण माहिती साठी आमच्या वेबसाइटला भेट द्या: MajhiNaukriYojana.com